जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर: घरकुल लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत निधी अजून पर्यंत प्राप्त झाला नसल्याने आवास योजनेतील लाभार्थी अडचणीत आलेले आहेत तर सदर लाभार्थ्यांना सात दिवसाचे आत निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा 23 जुलै रोजी तुमसर- बपेरा राज्यमार्गावरील सिहोरा येथे मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा तुमसर पं. स. उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी शासन व प्रशासनाला निवेदनातून दिला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसातही निधी अभावी आवास योजना पूर्ण झाले नसून लाभार्थ्यांना उघड्यावर वास्तव्य करण्याची वेळ आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुमसर तालुक्यात 4 कोटी 39 लाख रुपयांचा मजुरांचा निधी शासनाकडे अडून आहे. शासनाने हा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अन्यथा घरकुल लाभार्थी व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरांसह 23 जुलै रोजी सिहोरा येथे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन उभारणार. असा इशारा तुमसर पं. स. उपसभापती हिरालाल नागपूरे यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.