ब्रम्हपुरी – मंथन वेलफेअर फाऊंडेशनद्वारा आयोजित मंथन स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सभारंभ ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय (मुलांचे) सभागृह, ब्रम्हपुरी येथे रविवारला आयोजित हा कार्यक्रम पंचायत समिती ब्रम्हपुरीचे गटविकास अधिकारी मा. रविंद्र घुबडे, गटशिक्षणाधिकारी मा. माणिक खुणे, प्राचार्य गजानन रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी डाॅ. विद्या शेळके, पोलीस निरीक्षक मा. सदानंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीस संपन्न होणार असल्याची माहिती मंथन फाऊंडेशनच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयक मा. पूनम वाट यांनी सांगितले.
तालुका, जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादित आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार होणार असल्याचे यांनी सांगितले मंथन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची भिती दूर होऊन त्यांची पूर्व तयारी व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभर परीक्षेचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

