बेरोजगार युवकांकरीता मोबाईल रिपेयरिंग मोफत निवासी प्रशिक्षण

0
374

गोंदिया : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कुडवा, गोंदिया द्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरीता विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केले जात असून ही संस्था 21 जानेवारी 2011 पासून कार्यरत आहे. सदर संस्था भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे संचालित केले जाते. स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने आजपर्यंत 8514 ग्रामीण व्यक्तींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 5816 व्यक्तींनी मिळविलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार सुरु केला आहे. तसेच या संस्थेत विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची, जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे.

        बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेद्वारे मोबाईल रिपेयरिंग प्रशिक्षण 20 जुलै 2024 पासून 30 दिवशीय मोफत निवासी प्रशिक्षण सुरु होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर सदर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत.

        ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदनपत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहणे पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. असे संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम अब्दुल गणी यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी 07182-252007 किंवा 9403359907 यावर संपर्क साधावा.