
जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील मांगली (सि) येथे आज दिनांक 19 जुलै रोजी सायं. 5 वाजताच्या सुमारास शेतात रोवणी करीत असलेल्या महिला मजुरांच्या अंगावर वीज कोसळली यात एक महिला मजुराचा जागीच मृत्यू तर तीन महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, अंतकला हिरामण नेवारे व ६० वर्षे असे मृतक महिलेचे नाव असून नीला नीलकंठ करंडे, विजया मुन्नालाल शरणागत, शशिकला शरणागत असे जखमी महिलांची नावे आहेत. यावेळी जखमी महिलांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथे हलविण्यात आले असून घटनेचा अधिक तपास सिहोरा पोलीस करीत आहेत.


