तिरोडा/पोमेश राहंगडाले
तिरोडा तालुक्यातील ग्राम जमुनीया येथे वीज पडून जमुनीया येथील हंसराज पटले यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 19 जूलैला दुपारी चार वाजता च्या दरम्यान घडली आहे. मृतकाचे नाव हंसराज पटले असे असून शेतात धान पिक रोवणीचे काम सुरू होते. हंसराज आपल्या शेतावर गेले होते. दरम्यान अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हंसराज यांच्या जवळच असलेल्या मोहफुलाच्या झाडावर वीज पडली. मोहफुलाच्या झाडाजवळ असल्यामुळे त्या विजेच्या झळा हंसराज यांनासुद्धा बसल्या व यातच त्यांच्या घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला.

