तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात भाजपात नव्या नावाची चर्चा…

0
81

तिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे निरस्त झालेल्या भाजप पक्षाला उभारी मिळाली आहे. खरे तर या विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय राहंगडाले यांच्या कार्यसैलीवर अनेक स्वकीय नेते आणि मतदार नाराज असल्याची चर्चा नेहमीच विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळत होती. तरी सुद्धा  तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपने घेतलेली आघाडी म्हणजे भाजपासाठी नवसंजीवनी ठरली आहे.तरी सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत बोपचे यांनी मागील दहा वर्षापासून या विधानसभा क्षेत्रात पायाला भिंगरी घालून सतत जनसंपर्क ठेवला आहे.  त्यामुळे सध्या तरी या विधानसभा क्षेत्रात तर रविकांत बोपचे यांचा जनसंपर्क पाहता त्यांची बाजू भक्कम आहे हे विसरून चालणार नाही. महायुतीची विधानसभाची सीट भाजपा च्या कोट्यात जाईल हे सुद्धा दगडावरची काळी रेख आहे. अशावेळी रविकांत बोपचे किंवा  बलाढ्य होऊ पाहणारी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुकाबला करण्यासाठी भाजपचा चेहरा कोण?याची कुजबूज मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. खरे तर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु या वेळेस मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला  थोडे से  मताधिक्य असले तरी विद्यमान आमदारांवर असलेली नाराजी पाहता विधानसभा मध्ये हे मताधिक्य मिळेल याची साश्वती नाही. कारण लोकसभेचे चित्र वेगळे होते.आणि विधानसभेचे चित्र वेगळे राहील यात काही शंका नाही. जर रविकांत बोपचे किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुकाबला करायचं असेल तर भाजपला नव्या चेहर्यासाठी चाचपणी करावी लागणार अशी कुजबूज तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदारां समोर कोणाचीही बोलायची हिम्मत नसली तरी यावेळची विधानसभा निवडणूक भाजपसाठी इतकी सोपी राहणार नाही हे सर्वश्रुत आहे. भाजपचा कोणता चेहरा जो सर्वांना चालेल याविषयी गावागावात चर्चा सुरू आहे. विशेषता तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्यासह माजी आमदार हेमंत पटले,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागडाले,जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे, भाजपा युवक जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष ओम कटरे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते धर्मेंद्र तुरकर, माजी नगराध्यक्ष सोनाली ताई देशपांडे ही नावे चर्चेत आहेत. या सर्वांपैकी विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांचा पारडा जड आहे. परंतु विधानसभा क्षेत्राचा इतिहास पाहता तिसऱ्या वेळी कोणीही आमदार झालेला नाही. शिवाय आमदारांच्या विषयी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेली नकारात्मकता विरोधकांच्या फायद्याचे ठरेल असे बोलले जाते. दुसरे म्हणजे भाजपचे माजी आमदार हेमंत पटले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचा प्रभाव तिरोडा भागात पडेल का?ओम कटरे किंवा संजय टेंभरे यांना तिकीट दिली तर ही लोकं गोरेगाव भागात चालतील का?असा ही प्रश्न लोकांना पडला आहे. कारण ही सगळी राजकीय मंडळी आहेत वरून जरी आलबेल असले निवडणुकीच्या वेळी प्रामाणिकपणे काम करतील यावर शंका आहे. म्हणून भाजपने नवीन उमेदवार दिला तर विद्यमान आमदार किंवा त्यांचा समर्थकांचा भाजपच्या नव्या उमेदवाराला किती सहकार्य मिळेल याविषयी सुद्धा नागरिकांच्या मनात शंका आहे. सोनाली ताई देशपांडे माजी नगराध्यक्ष आहेत. भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांची चांगली ओळख आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात भाजप महिला उमेदवार देऊन दाव खेळणार का याविषयी मात्र शंका आहे. धर्मेंद्र तुरकर यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर यांची राजकीय क्षेत्रात ओळख नसली तरी संघाचे एकनिष्ठ व पक्ष बांधणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिवाय उच्चशिक्षित आणि सर्वच लोकांना चालणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपा ने जर धर्मेंद्र तुरकर यांना उमेदवारी दिली तर तिकिटासाठी असलेली भाजपच्या आतील गटबाजी राहणार नाहीं. आणि ते विरोधी पक्षा च्या उमेदवाराला  जोरदार टक्कर देतील  अशी चर्चा  आहे. एकंदरीत अगदी काही दिवसातच  चित्र स्पष्ट होणार आहे. पण एक मात्र खरे की यावेळी तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीची घोडदोड पाहता भाजपला योग्य उमेदवार देणे गरजेचे आहे. अशा  चर्चा गावागावात रंगू लागले आहेत.

Previous articleतिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात भाजपात नव्या नावाची चर्चा…. 
Next articleतिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्रात भाजपात नव्या नावाची चर्चा