काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत… जन्मदिनी काँग्रेस जिल्हा महासचिव निलम हलमारे यांचं महादेवाकडे साकडं…

0
779
1

गोंदिया : वाढदिवस म्हटलं की या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत असतात. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव नीलम हलमारे यांनी (ता.१९ )गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नागरा येथील मंदिरात जाऊन महादेवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री बनाव असं साकडे त्यांनी महादेवाकडं घातलं… तर विधानसभा निवडणुकीत नानाभाऊ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जी काही मेहनत घ्यावी लागेल ते आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते मिळून घेऊ व नानाभाऊंना मुख्यमंत्री करू असेही ते म्हणाले…