राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननिय ना. अजितदादा पवारजी यांचा वाढदिवसा निमित्त अजित पर्व या कार्यक्रमाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२४ रोज सोमवारला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेखा व संचालन खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात होत असून रक्तदान शिबीर, भव्य महिला मेळावा, वृक्षारोपण, लाडली बहन योजना सह विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, गोंदिया येथे रक्तदान शिबीर, मोक्षधाम परिसर कुडवा येथे वृक्षारोपण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटंगी येथे वृक्षारोपण, विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, गोंदिया येथे भव्य महिला मेळावा, सौ.अश्विनी रवी पटले निवास स्थान, एकोडी, येथे लाडली बहन योजना शिबीर उदघाटन व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरील कार्यक्रमांना विनोद हरिणखेडे, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, केतन तुरकर, गणेश बरडे, रफिक खान, सौ पूजा अखिलेश सेठ, सौ. कीर्ती पटले, सौ.बिरजूला भेलावें, निरज उपवंशी, अखिलेश सेठ, रवी पटले, टी.एम.पटले, नानू मुदलियार, सौ. नेहा तुरकर, सौ. अश्विनी पटले, श्रीमती माधुरी नासरे, सौ. सरला चिखलोंडे, शंकरलाल टेभरे, शिवलाल जामरे, राजेश जमरे यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
वरील कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हि विनंती.
विनीत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गोंदिया

