भंडारा जिल्ह्यासह राज्यातील सरपंच संघटना विविध मागण्यांसाठी मुंबई येथे धडक मोर्चा काढणार – सरपंच संघटनाध्यक्ष शरद इटवले

0
149

भंडारा – सरपंचासाठी मानधनात भरीव वाढ करण्यात यावी,तीन लाखाच्या वरील कामे ग्रामपंचायतीला करू न देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करून ग्राम पंचायतला अधिकार देण्यात यावे,आमदार खासदार यांच्या प्रमाणे सरपंचांना देखील पेन्शन योजना सुरू करावी कारण ते देखील लोकप्रतिनिधी आहेत.शासनाने बंद केलेल्या 13 दाखल्याचा आदेश पुन्हा लागु करावा,शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी घर टॅक्स पावती बंधनकारक करावी.आदी मागण्या अश्या मागण्यांना घेऊन भंडारा जिल्हासह राज्यातील सरपंच संघटना मुंबई येथे धडक मोर्चा काढणार आहे अशी माहिती भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष इटवले यांनी दिली असून या संदर्भात संघटनेची बैठक सुद्धा पार पडली आहे.

शासन इतर कर्मचाऱ्यांचे मानधनात वाढ करित असताना गावाचा मुख्य घटक असलेल्या सरपंचाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे सोबतच ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या दलित वस्ती,जन सुविधा,नागरी सुविधा,तांडा वस्ती,आदि योजनांबाबतही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच संघटना मुंबईत धडक देणार आहे.येत्या 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान मुंबई येथे ग्रामविकास मंत्रालयासमोर सरपंच संघटना आंदोलन करणार असल्याचे यावेळी राज्य सल्लागार राजेश कराडे विदर्भ प्रमुख ॲड.देवा पाचभाई यांनी सांगितले.सदर बैठकीला विदर्भातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleहम इतिहास के आलोक में पोवार समाज को आगे बढ़ायेंगे …! -इतिहासकार प्राचार्य ओ सी पटले
Next articleसख्ख्या लहान भावाने दारूच्या नशेत मोठ्या भावाचा घेतला जीव