लाखनी तालुक्यातील न्याहारवाणी (डोंगरगाव ) येथील ११:३० ची घटना…तेजेंद्र क्रिष्णा नागलवाडे(३२) असे मृतकाचे नाव तर प्रवीण क्रीष्णा नागलवाडे (२८) आरोपीचे नाव.. आरोपी ताब्यात
पालांदूर/प्रतिनिधी
दारूच्या नशेत लहान भावाने मोठ्या भावाचा लाठीकाठी व लोखंडी पाऊसीने डोक्यावर व गालावर वार करीत खून केला. तेजेंद्र क्रीष्णा नागलवाडे (३२) असे मृतकाचे नाव असून प्रवीण क्रीष्णा नागलवाडे (२८) आरोपीचे नाव आहे.ही घटना शुक्रवारला (दिनांक.१९ जुलै ) सकाळी ११:३० वाजे दरम्यान लाखनी तालुक्यातील न्याहारवाणी /डोंगरगाव येथे घडली. आरोपीवर १०३(१) भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपीला पालांदूर पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंह, ठाणेदार सुनील राऊत , फॉरेन्सिक पोलीस अधिकारी कर्मचारी भंडारा यांनी भेट दिली.घटनेतील मृतक व आरोपी हे दोघेही सख्खे भाऊ असून दोघांनाही दारूच्या व्यसनाने जखडले होते. घटनेच्या वेळी सुद्धा दोघेही दारूच्या नशेत होते. घटनेवेळी घरात कोणीही नव्हते. आरोपीने मृतकावर जीवघेणा वार करून त्याला तशाच अवस्थेत सोडून आरोपी गावात निघाला. गावातील चौकात रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलीस पाटील लेकराम नागलवाडे न्याहारवाणी यांना दिसला. हटकले असता काही न बोलता घटनास्थळी गेला. त्या पाठोपाठ पोलीस पाटील सुद्धा त्याच्या घरी पोहोचले. बघतो तर काय, मृतक तेजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. पोलीस पाटील यांनी तत्काळ पालांदूर पोलीस स्टेशन व आरोग्य विभागाच्या १०८ ला माहिती दिली. घटनास्थळी पालांदूर पोलीस पोहोचले. १०८ ची आपत्कालीन व्यवस्था सुद्धा पोहोचली. तेजेंद्र व आरोपी प्रवीण या दोघांनाही १०८ ने उपचाराकरिता भंडारा येथे नेत असताना वाटेत आरोपीने गजेंद्र ची गच्ची पिकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान साधत आरोपीला बाजूला केले. मात्र थोड्या दूर अंतरावर गेल्यावर तेजेंद्र मृत्युमुखी पडला.मृतक व आरोपी यांना आई, व मतिमंद बहीण एवढाच परिवार आहे. घटनेच्या वेळी घरात कुणीही नव्हते. दोन्ही भावंडाचे दारूच्या व्यसनात नेहमीच भांडण व्हायचे हे विशेष!.