जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
मोहाडी- मोहाडी तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी नुकताच बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्राचा दौरा केला.अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मौजा बेटाला येथे श्री प्रकाश तीतिरमारे यांचे घरी परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे देण्यात यावे,इंदुरका मायनर वर मुरूम टाकने, डोंगरदेव ते मांडवी रस्ता दुरुस्त करावे,धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे, कृषीपंपांना ८ तासायेवजी १२ तास विज पुरवठा करण्यात यावे,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन निधी देण्यात यावी.वाढलेले विजेचे बिल कमी करण्यात यावे,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अर्ज मंजूर करण्यात यावे. इत्यादी समस्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या समोर मांडल्या.समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूजी ठवकर,माजी पंचायत समिती सदस्य गणेशजी कुकडे, धिवरवड्याचे सरपंच थामदेव वणवे,माजी पंचायत समिती सदस्य अनिलजी राऊत,सेवा सह.संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आगासे,प्रकाश तितिरमारे,उमेश मोहतुरे,विश्वनाथ बांडेबुचे,लक्षमनजी धोंबले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

