



# क्रीडा संकुल परिसरात आयोजन
आमगाव:- क्रीडा संकुल आमगाव परिसरात बॅडमिंटन खेळाडूंनी वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण सह जनजागृती कार्यक्रम आयोजीत केले .
आयोजीत वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रवी क्ष्रीसागर यांच्या उपस्थितीत सोनू मेंढे, डॉ.पिंटू वाळके, आशिष माहेश्वरी,शरद अग्रीका, मनिष असाटी, गोलू सेठीया,अशोक गुप्ता ,सोनू अग्रवाल,मुकुल अग्रवाल,ललित अग्रवाल, राजकुमार असाटी आदी उपस्थित होते.
यावेळी वाढती जनसंख्या व मानवीय गरजा पूर्ण करण्यासाठी वाढलेले उद्योगीकरण यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्ते महामार्ग निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन बिघडले आहे तर यामुळे प्रदूषणात भर पडली आहे.नागरिकांनी वृक्ष लागवड करून प्रदूषण संतुलन राखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे याकरिता जनजागरण व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी क्ष्रीसागार यांनी मत व्यक्त केले.
यावेळी क्रीडा संकुल परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सोनू मेंढे यांनी केले.


