गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (मुंबई-कलकत्ता) वर कोहमारा-देवरीच्या मधोमध जंगल परिसर असल्याने व वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास असल्याने वन्यप्राण्यांना आवागमन करण्याकरिता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.
आठवड्याभरापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावर एक मोठा भगदाड पडलेला आहे. परिणामी आता एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. मात्र पूल निर्माण झाल्याच्या अवघ्या काही दिवसातच मोठा भगदाड पडल्याने या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.