गोंदिया/धनराज भगत
नुकताच डी.एम.एल.टी. परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. या जिल्ह्यातील आमगाव येथील हर्षें पॅरामेडिकल व ॲग्रीकल्चर कॉलेज मधील कुमारी ज्योती विजयकुमार रहाणारे या विद्यार्थिनीने सदर परीक्षेत 95.44% गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. ज्योती विजयकुमार रहांगडाले ही आमगाव तालुक्यातील भजेपार या गावातील विद्यार्थिनी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने वर्गातील 70 विदयार्थ्यांमधून प्रथम येत यश शिखर गाठले आहे. विशेष म्हणजे याच गावातील कुमारी प्रीती सोनवणे, स्वाती चौधरी,प्रेरणा बिसेन यांनी सुद्धा उत्तम यश मिळवले आहे. ज्योती रहांगडाले हिने आपल्या यशाचे श्रेय माता-पिता व गुरुजनांना दिले आहे.

