गोंदिया : आज मा. ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व प्रयास संस्था च्या संयुक्त वतीने रक्तदान शिबिर व जेष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी माननीय अजितदादा पवारजी यांचा वाढदिवस साजरा करतांना निरोगी आरोग्य व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक हरीश शंकरराव उके, रामलाल बिसेन, नथ्यूजी शरणागत, राजेंद्र लिल्हारे, नरेंद्र रहांगडाले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिराला शहर अध्यक्ष नानू मुदलियार, केतन तुरकर, टी. एम पटले, अखिलेश सेठ, सुनील पटले, शैलेश वासनिक, कपिल बावणथडे, करण टेकाम, नागो बन्सोड,प्रशांत सोनपुरे, रौनक ठाकूर, पिंटू बनकर, हर्षवर्धन मेश्राम, श्रेयस खोब्रागडे, कुणाल बावनथडे, मोनू मेश्राम, झणकलाल ढेकवार, नेमीचंद ढेकवार तसेच बाई गंगाराम रुग्णालयाचे ब्लड चे डॉ स्नेहल पेंदाम, डॉ अनिल देशमुख, नवनाथ महाजन, चेतन गायराने, गणेश हुल्ले, प्रतीक बन्सोड, शुभम मेश्राम, ईश्वर लुटे यांचे सहकार्य लाभले.