ब्रम्हपुरी – मंथन वेलफेअर फाऊंडेशनद्वारा आयोजित मंथन स्पर्धा परीक्षेतील केंद्र, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सभारंभ ब्रम्हपुरी येथे पार पडला.
नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय (मुलांचे) सभागृह, ब्रम्हपुरी येथे रविवारला प्राचार्य मा. गजानन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समिती ब्रम्हपुरीचे गटविकास अधिकारी मा. रविंद्र घुबडे, गटशिक्षणाधिकारी मा. माणिक खुणे, केंद्रप्रमुख मा. दिलीप वैद्य, प्राध्यापक ठोंबरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र, तालुका, जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादित आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. मंथन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी होण्यासाठी संपूर्ण राज्यभर दरवर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. गुणवंतांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मंथन फाऊंडेशनचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला मा.विकास दुपारे, मा. स्मिता उराडे, मा. अनंता ढोरे, मा. देवानंद तुलकाने, मा. दिलीप बावनकर, मा. भाविक सुखदेवे, मा. अलका भोयर, मा. अनिल बावनकर, मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या समन्वयक पुनम भारत वाट, प्रीती आशिष घोनमोडे, प्रकाश शेबे, ज्ञानेश्वर सिंदपुरे, भारत वाट, महेंद्र रहांगडाले, ज्ञानेश्वर नवले, आशिष घोनमोडे घोनमोडे, गणेश प्रधान, सचिन परशुरामकर, गुंजार झिंगरे, प्रेमचंद अवसरे, राजन खराबे, निलकंठ गौतम, मोहन दोडके, हिवराज बनकर, वंजारी सर आदी मान्यवर विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुलाब बिसेन यांनी तर आभार मंगेश पातोडे यांनी मानले.

