डिलेशच्या या अपघाताने कुटुंबावर संकट

0
433

सालेकसा / बाजीराव तरोने

सालेकसा : तालुक्यातील घोंशी येथील युवक डीलेश तांडेकर वय 34 वर्ष हे आपल्या दैनंदिन रोजी मजुरीच्या कामाने जात असता 23 जुलै रोजी रेल्वे रूळ ओलांडत असताना पाऊस सुरू असल्यामुळे त्यांचा लक्ष रेल्वे गाडी कडे नसल्याने दरबडा धानोलीच्या मधात पूर्वेकडून पश्चिमे ला जात असताना वंदे भारत ट्रेन ने अपघात झाल्याने डीलेशचा उजव्या पाय गमवावा लागला. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी नेले असुन उपचार सुरू आहे.

सदर घटने संबंधी  दि.२३जुलै रोजी जी बातमी प्रकाशित झाली होती ती बातमी चुकीची होती .त्या बातमीचा  खंडन करीत ही सत्य बातमी प्रकाशित करण्यात आली.

या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे.डीलेश वर त्याच्या कुटुंबाची धुरा असून चिमुकल्या दोन मुली आहेत.

 

Previous articleपूर्व विधायक राजेंद्र जैन के हस्ते गोंदिया शहर में विकास कामों का भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
Next articleनगर परिषद संघर्ष समिती पुन्हा आक्रमक