➡️ पूल,कालवे बांधकामावरील खड्डे देतात अपघातांना आमंत्रण
➡️ खासदार यांच्या निवास जवळील रस्त्यांची दैनावस्था
➡️बांधकाम कंपनीवर कार्यवाही होणार काय?
आमगाव : तीन राज्यांना जोडणारा व आमगाव शहरातून मार्गक्रमण होणारा राष्ट्रीय राज्य मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या कामचुकारपणामुळे रस्त्यावरील निर्माण झालेले रस्ते खड्यात पुरले गेले आहेत. त्यामुळे नागरिक व वाहने अपघातांना समोर जाताना दिसत आहेत.
आमगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक ५४३ आमगाव देवरी २०१७ ला बांधकाम कंत्राट एम.बी.पाटील काँट्रेक्शन लिमिटेड कंपनी ला देण्यात आले होते. ३८ किलोमिटर लांब रस्ते बांधकाम बजेट एकूण २८० कोटी रुपये मंजूर करण्यात आला होता.परंतु या बांधकामाला पाच वर्ष उलटून सदर बांधकाम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. या रस्ते महामार्ग वरील अनेक पुल,कालवे यावरील बांधकाम रखडले आहे.यामुळे अनेक कालवे व पुलावरील रस्ते खड्यात पडले आहे.सद्यस्थितीत पावसाळा सुरू असून या महामार्ग कालवे व पुलावर पडलेल्या खड्यात पाणी साचले आहे.त्यामुळे रस्ते वाहतूक होताना नियंत्रण सुटून अपघात होत आहेत.
सदर महामार्ग बांधकाम होत असताना विभागाच्या वतीने कंत्राटदार कंपनीवर कधीच नियंत्रण ठेवले नाही.त्यामुळे या महामार्गावर अनेक छोटे तुकडे पाडून खाजगी ठेकेदार यांना पेटी कंत्राट देऊन मार्ग निर्माण करण्यात आले.पाच वर्ष लोटूनही रस्ते महामार्ग कडेला असलेल्या नाल्यांचे कामे अपूर्ण सोडण्यात आले.त्यामुळे अनेक गावे व शहर भागात पावसाचे पाणी साचून पूरर्जन्य परिस्थिती निर्माण होत आहे.या महामार्गावरील बाम्हणी,बोरकन्हार या गावातील रस्त्यांना लागून असलेली शेती पाण्यात गाडली जात आहे .नाली बांधकाम नियोजन अभावी शेती पाण्याखाली जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे. आमगाव शहरातील या मार्गावरील अनेक ठिकाणी नाले बांधकाम अपूर्ण पडली आहे.त्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे.तर अनेक कॉलोनी मध्ये पूरर्जन्य परिस्थिती निर्माण होत आहे. महामार्ग बांधकाम करणारी कंपनी सुरवातीपासूनच या बांधकामावर निकृष्ट दर्जाचे बांधकामाला चालना दिली आहे.परंतु संबधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे महामार्गावर खड्डे ,भेगा पडल्याचे निदर्शनास येत आहे.
खासदार निवास जवळील महामार्ग वर खड्डे,भेगामुळे अपघाताला विभागाची वक्रदृष्टी पडल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली लोकसभा चे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे निवास आमगाव येथे याच महामार्गावर आहे. कंत्राट कंपनीने मुदतीच्या पाच वर्षानंतर कालवे वरील बांधकाम केले केले आहे.परंतु या बांधकामात कालवे पुलावरील खड्डे मात्र सपाट करण्यास विसर पडला आहे. तर कालवे पुलावरील सिमेंट रस्ता पूर्ण करण्यात विभागाला अद्यापही यश आले नाही त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
कंत्राट कंपनीचे बांधकाम ऑडिट करण्यात यावे :
सदर ५४३ आमगाव देवरी राष्ट्रीय राज्य महामार्ग बांधकाम करताना कंत्राट कंपनीने नियोजित बांधकाम केले नाही.अद्यापही या बांधकामावरील अपूर्ण कामे असल्याने अपघातांना समोर व्हावे लागत आहे .या बांधकामांचे बांधकाम ऑडिट करण्यात यावे अशी मागणी इंजीनियर प्रा. सुभाष आकरे यांनी केली आहे.

