गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक वात्सल्य सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना आपण सदैव विकासाचा निर्धार करूनच भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यात विकासाची कामे करीत आहे आणि पुढेही करीत राहू असे वक्तव्य खासदार प्रफुल पटेल यांनी केले
पुढे बोलताना श्री पटेल म्हणाले की, जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना बोनस, शिक्षणाच्या क्षेत्रात व आरोग्य सेवा सामान्य माणसाला उपलब्ध व्हावी व वैद्यकिय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावी याकरिता मेडिकल कॉलेज, शेतकऱ्यांच्या हितासाठी लाखांदूर येथे साखर कारखाना व लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात आणलेले प्रकल्प व विकासासाठी अविरत भविष्यातही प्रयत्न करणार. असा विकासाचा पाढाच श्री पटेल यांनी वाचला. भाजपची मैत्री ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी केली भंडारा गोंदिया जिल्ह्याला विकासाच्या निरंतर प्रवाहात आणणे आणि येथील जनतेला सर्व घटकांना योजनांचा लाभ व्हावा हाच एक प्रामाणिक हेतू ठेवून मैत्री करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूकीला आपण सर्वांनी युती धर्मानुसार प्रामाणिकपणे काम करायचे आहे.
याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री मनोहर चंद्रिकापुरे, यशवंत गणवीर, प्रेमकुमार रहांगडाले, किशोर तरोणे, डॉ सुगत चंद्रिकापुरे, मंजुषा बारसागडे, नामदेव डोंगरवार, अविनाश ब्राह्मणकर, विशाल शेंडे, लोकपाल गहाणे, दानेश साखरे, रतिराम राणे, भोजराम रहिले, राकेश जयस्वाल, आम्रपाली डोंगरवार, पुष्पलता द्रुगकर, राकेश लंजे, माधुरी पिंपळकर, उद्धव मेहंदळे, सुधेश माधवानी, सुशीला हलमारे, योगेश नाकाडे, हिरालाल शेंडे, निप्पल बरीया, दीनदयाल डोंगरवार, किशोर ब्राह्मणकर, हर्षा राऊत, वीरेंद्र जीवानी, सुदेश वाधवानी सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्या, शेतकरी बंधू, व पत्रकार उपस्थित होते.