तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राला अतिवृष्टि मदत द्या – डॉ.हेमंत राहांगडाले

0
122

भंडारा : जिल्यात गेल्या तीन चार दिवसापासून सातत्त्याने येत असल्यापावसामुळे अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे . या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे सोबतच घरांची ही पडझड झाल्याने अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानग्रस्तानां तातडीने मदत देण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे शिवसेना विधानसभा समन्वयक डॉ.हेमंत राहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले .
शिवसेना तुमसर-मोहाडी विधानसभा समन्वयक डॉ.हेमंत राहांगडाले यांच्या नेतृत्वातील शिवसेना {उद्धव बाळासाहेब ठाकरे} पार्टी शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्री यांना पाठवलेन्या निवेदनात तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील धान,मक्का,भाजीपाला,फळबागे तसेच मोहाडी – तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून किंवा पंचनामे न करता सरसकट तातडीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असे लिहिले आहे . विधानसभेतील अनेक शेतकरी नगदी पिके म्हणून भाजीपाल्याची लागवड सुद्धा केलेली आहे .
पंरतु काही दिवसापासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने धान,भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे . त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी . सोबतच अतिवृष्टीमुळे रोड,रस्त्यांची खराबी झालेली असल्याने तातडीने डागडुगी करण्यात यावी तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर तातडीची उपाययोजना व त्याचे निराकरण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय व तालुका स्तरावरील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या आरोग्याकारीता औषधांचा साठा व डास ,डेंगूची फवारणी इत्यादी औषधी तातडीने उपलब्ध करण्याबाबत विविध मागण्यांच्या समावेश यात करण्यात आले आहे. मोहाडी येथील नायब तहसीलदार यांना निवेदन देतांनी प्रामुख्याने शिवसेना विधानसभा समन्वयक डॉ.हेमंत राहांगडाले,शिवसेना शहर प्रमुख  नारायण निखारे,शाहीर प्रभाकर तेलंग,उपतालुका प्रमुख व सरपंच मधुभाऊ बुरडे,माजी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.शिवशंकर दृगकर, उपतालुका प्रमुख कैलाश राहांगडाले,विभाग प्रमुख राखीचंद राहांगडाले,विभाग प्रमुख राजेंद्र बावणे,युवासेना तालुका प्रमुख डॉ.प्रणय चव्हाण आदी उपस्थित होते .

Previous articleसदैव विकासाचा निर्धार – खा. प्रफुल पटेल
Next articleपूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वेक्षण करा, खा. पटेल यांनी दिले प्रशासनाला निर्देश