पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वेक्षण करा, खा. पटेल यांनी दिले प्रशासनाला निर्देश

0
899
1

गोंदिया : मागील काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात सतत अतिवृष्टी होत आहे त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांसह हजारो हेक्टर जमीन पीक पाण्यात सापडले. किंबहुना पिकवाहून गेले. एवढेच नव्हे तर घरांचे व गुरांचे गोठे पडझड सुरु झाली आहे. एकंदरीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी व जीवितं हानी सुद्धा झाली आहे हि सदृश्य परिस्थिती लक्षात घेत त्वरित नुकसानीचे सर्वेक्षण करून तसे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे. तात्काळ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला दिला जाईल यासंबंधी कार्यवाही करावी अश्या सूचना प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेत असतांना खा. प्रफुल पटेल यांनी जिल्हयाचे कृषी अधिकारी यांचा सह अधिकाऱ्यांना दिल्या.

गोंदिया जिल्हयाच्या दौऱ्यावर असतांना खासदार प्रफुल पटेल यांनी पूर परिस्थितीसंबंधी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मागील सहा सात दिवसापासून जिल्ह्यात सतत अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातिल पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात धान, मका, भाजीपाला, फळबागांचे उत्पादन घेतले जात असून या सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत तात्काळ जिल्हयाचे कृषी अधिकारी यांना पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वेक्षण करण्याचे खा. प्रफुल पटेल यांनी निर्देश दिले.