एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये जिल्हास्तरिय रेड रन मॅरेथॉन व ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024 चा आयोजन संपन्न

0
190

गोंदिया : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, महाराष्ट्र शासन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रूग्णालय, गोंदिया द्वारा एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये जिल्हास्तरिय रेड रन मॅरेथॉन व ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024 चा आयोजन दि. 26 जुलाई 2024 ला करण्यात आला. या कार्यकमाचा उद्घाटन डॉ अमरीश मोहबे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदिया यांचाहस्ते करण्यात आला. या कार्यकमाला प्रामुख्याने जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदियाचे  संजय जेनेकर जिल्हा पर्यवेक्षक, प्रकाश बोपचे,  रवी बघेले,  भारत मोहतंशी,  दिग्वेश ब्राम्हणकर व  रन प्रवीण इंदूरकर उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. अमरीश मोहबे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानां HIV विषाणू बददल माहिती व त्यावरील प्रतिबंधक उपाय सुचविले रेड रन मॅरेथॉनची सुरूवात डॉ. अमरीश मोहबे यांनी हिरवी झंडी दाखवून केली. तसेच Run For AIDS Control या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रितेश मुन्ना टेंबरे हा प्रथम, आदित्य मनोहर मसराम द्वितीय व राजेश ओमकार सराटे हा तृतीय कमांकाचा मानकरी ठरला तसेच रेड रन मॅरेथॉनमध्ये मुलींच्या गटात निकीता राजेश आंबेडारे ही प्रथम, गीता चंद्रभान गहाने द्वितीय व कैरण सुनिल पटले ही तृतीय कमांकाची मानकरी ठरली तसेच मुलांच्या गटात आदित्य मनोहर मसराम हा प्रथम, राजेश ओमकार सराटे द्वितीय व मनीष लालचंद गौतम हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

Previous articleमहायुतीची सरकार प्रगती व उन्नती करीता कटिबद्ध – खा. प्रफुल पटेल
Next articleलाडली बहीण योजनेला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद