आमगाव : येथील न.प.अंतर्गत कामठा रोड मार्गावरील
ओम नगर (बनगांव) स्थित भंगार दुकानामुळे वसाहतीतील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर ओम नगरवासीयांनी भंगार दुकान हटविण्याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. ओम नगरमध्ये अनेक वर्षांपासून कबाडीची दुकान आहे. तेथे भंगार विक्रेत्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. यामुळे अन्य वाटसरुंना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच भंगारातील काच, खिळे व अन्य सामान रस्त्यावरच पडून राहते. त्यामुळे तेथील लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही? कबाड दुकान मालकांकडून प्लास्टिक व इतर साहित्य जाळून तेथेच विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व प्रदूषण पसरत आहे. याबाबत घरमालकाला वारंवार कळवूनही त्याने कबाड दुकाना अन्यत्र हलविले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन कबाड दुकान हटविण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना जीवन जीभकाटे खेमराज बिसेन, श्याम नायडू, चंद्रकांता मटाले, हर्षद फुंडे, राधेश्याम भोयर, इरफान जमील हुक, हसनदास बोकडे, नीलेश सरोदे, गेंदलाल गायधने रंजिता गायधने, संतोष गायधने, बुधराम हत्तीमारे, विजय फुंडे, सदारामा शिवणकर आदींनी मागणी केली आहे.