➡️ प्रसिध्द विचारवंंत प्रा.लक्ष्मण यादव व ओबीसी सेवा संंघाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळेंची उपस्थिती… ➡️ ७ आँगस्टला सडक अर्जुनी येथे दुपारी २ वाजता होणार यात्रेचे आगमन…
गोंदिया,दि.28 –दरवर्षीप्रमाणे नागपूर येथून निघत असलेल्या मंडल यात्रेचा समारोप येत्या ७ आॅगस्ट २०२४ रोजी गोंदियाच्या ग्रीन लॅंड लाॅन बालाघाट टी पॅाईंट गोंदिया येथे होणार आहे.या यात्रेचे गोंदिया जिल्ह्यात आगमन दुपारी २ वाजता सडक अर्जुनी येथे होणार असून गोंदियात सायकांळी ५ वाजता पोचणार आहे.
मंडल यात्रा जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी बहुजन विचारवंत प्रा.लक्ष्मण यादव तसेच ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे उपस्थित राहणार आहेत.यात्रेचे नेतृत्व ओबीसी युवा अधिकार मंचचे सयोंजक उमेश कोर्राम हे करीत आहेत.त्या मंडल यात्रेच्या आयोजन निमित्ताने २७ जुलै शनिवार रोजी येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकित मंडल यात्रा समारोप कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासह निधीसंकलनावर चर्चा करण्यात आली.तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाकरीता व आधार योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीला ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,अशोक लंजे,कैलाश भेलावे,एड.पी.सी.चव्हाण,प्रमोद गुडधे,ओबीसी संंघर्ष समितीचे एस.यु,वंजारी,विष्णु नागरीकर,कमल हटवार,ओबीसी सेवा संंघाचे रामभगत पाचे,सी.पी.बिसेन,प्रमोदकुमार बघेले,वशिष्ट खोब्रागडे,विनयकुमार बघेले,अजय खांडेकर,भीकाराम माने,मनिष बलभद्रे, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेम साठवणे,परेश दुरुगकर,जनार्दन बांते यांच्यासह ओबीसी एसस्सी,एसटी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.