जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न

0
450

आमगाव : गोंदिया जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन द्वारे आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन आमदार  विनोद अग्रवाल यांच्या हस्ते व सीए  सुशील अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार विनोद अग्रवाल यांनी खेळाडूंनी कठीण आसने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शरीर सुदृढतेसाठी योगासनाचे महत्त्व विशद केले व योगासन स्पर्धा म्हणून आता इतक्या चांगल्या स्तरावर सुरू आहे, त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.  सुशील अग्रवाल यांनी सुदृढ शरीर, सुदृढ मनासाठी योगासनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालक सचिव विनायक अंजनकर यांनी केले.
जिल्हा योग असोसिएशन, दिव्ययोग फाउंडेशन व निखिलेश्वरानंद योग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा पारंपारिक एकल, कलात्मक एकल या प्रकारात घेण्यात आली. पारंपारिक योगासन प्रकारात १० ते १४ वर्ष वयोगटात रिया नाकाडे, प्राची तुरकर, पुनम वाढई, मयंक बरीये, श्रेयश मेश्राम, मित राठी, १४ ते १८ वर्ष वयोगटात निकुंच हेमने, नियती अंबुले, कसक शेंडे, विनाईक टेंभरे, निर्भय डोलारे, १८ ते २८ वर्ष वयोगटात नेहा शेंडे, तरंग मुलचंदानी, निकिता मेश्राम, चेतन डोलारे, २८ ते ३५ वर्ष वयोगटात वंदना डोडानी, सीमा नागपुरे,रविशंकर नागपुरे, रोहित धार्मिक, राजेश येडे ३५ ते ४५ वर्ष वयोगटात काजल चांदवानी, भावना ठकरानी, सुखविंदर कौर चहल, अनिरुद्ध कनोजे, गौरव कुमार चन्ने, ४५ ते ५५ वर्ष वयोगटात प्रीती प्रिथ्यानी, मंगला कटरे, सुमती डोलारे, दीपक कुंदनानी यांनी तर कलात्मक एकल प्रकारात १० ते १४ वर्ष वयोगटात स्पर्श बडोले यांनी यश संपादन केले. विजयी स्पर्धकांची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत पंच म्हणून शशांक कोसरकर, दिव्या भोजवानी, लक्ष्मण चव्हाण, चेतना नागपुरे, दिपाली कठाणे, झनकलाल बघेले, आतिशकुमार लोणारकर यांनी कार्य केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण  सुरेश कोसरकर यांच्या अध्यक्षतेखाली  प्रेम चांदवानी,  पंकज ठाकूर श्रीमती दिव्या भोजवानी, सुमती डोलारे यांच्या हस्ते करण्यात आले. विजय खेळाडूंना मेडल व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी  विनोद (गुड्डू) चांदवानी, रविशंकर नागपुरे, हेमंत चावके, मुकुल अग्रवाल, अनमोल बडोले, भव्य दोनोडे, सुरेश रहांगडाले ,अनिरुद्ध कनोजे आदींनी सहकार्य केले.

Previous articleगोंदियात मंडल यात्रेचा समारोप ७ आँगस्ट रोजी
Next articleइतिहास के पन्नों में भारत की महानता के दर्शन होते हैं…! – इतिहासकार प्राचार्य ओ सी पटले