गोंदिया, (दि.30): 27 एप्रिल 2024 रोजी ऑन ड्युटी स्टेशन उपअधीक्षक रेल्वे स्टेशन गोंदिया यांनी लेखी मेमोद्वारे कळविले की, रेल्वे स्टेशन गोंदिया प्लेटफॉर्म नं.5 वरील नळाचे खाली एक अज्ञात व्यक्ती बेशुध्द अवस्थेत पडून असून सदर इसमास रेल्वे डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. अशा माहितीवरुन सदर घटनेबाबत रेल्वे पोलीस ठाणे, गोंदिया येथे मर्ग नं.20/2024 कलम 174 जा.फौ. प्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला असून सदर मर्गचा तपास पोलीस हवालदार प्रशांत उजवणे करीत आहेत.
अनोळखी पुरुषाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. वय- अंदाजे 65 वर्षे, उंची- अंदाजे 168 से.मी., चेहरा- लांबट, बांधा- सडपातळ, डोक्याचे केस- बारीक पांढरे, दाढी मिशी- पांढरी बारीक, नेसनीस- पांढऱ्या रंगाची लुंगी, ओळखचिन्हे- उजव्या हाताचे पंज्यावर ओम असे गोंदलेले. तरी अशाप्रकारचे वर्णन असलेले अनोळखी पुरुष जर कोणाचे नातेवाईक असल्यास त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथे संपर्क साधावा, असे रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया यांनी कळविले आहे.