
गोंदिया : 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संरक्षण दिना निमित्त सुप्रभात परिवार गोंदिया अंतर्गत या दिवसाचे महत्व पृथ्वी वरील नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण कसे टिकवून ठेवता येईल… हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, आपली पृथ्वी वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनाने भरलेली आहे. त्यात,जंगल,जल स्रोत, खनिजे,जैविविधता या सर्वांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
म्हणून या दिवसाचे महत्व लक्षात घेता ‘सुप्रभात परिवार’ गोंदिया ने केला वृक्षारोपण व या दिवसाचे महत्व अधोरेखित करताना आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे म्हणून वृक्षारोपण सोबत झाडांची जोपासना कसे करता येईल झाडांचे कसे रक्षण करता येईल म्हणून ट्री गार्ड ची व्यवस्था करून आजचे महत्व लोकांसमोर ठेवण्यात आले.
त्यात सुप्रभात परिवाराचे सदस्य लोकचंद डोणेकर, बाबुराव नंदेश्वर,देवेश पशीने ,दिगंबर लिचडे,,भुरूभाई शेख, साहेबलाल बिसेन, शिवशंकऱ वालोंदे, कल्लू भैय्याजी सुरसे, तिलकचंद ठाकूर, खोडपेजी, ईश्वऱ जनबंधू , मनीष बलभद्रे मुकेश वैदय, चंद्रशेखर भोंडेकर, जगदीश राऊत, आनंद पटले, शिवकुमारजी नागपुरे मुकेशजी लांजेवार, अरविंद रंगारी या सर्वांनी आजच्या दिवसाचे महत्व समाजा समोर मांडत असतांना गोंदिया I.T.I.पासून तें कारंजा साई मंदिरा पर्यंत वृक्षारोपण करून संरक्षण म्हणून ट्रीगार्ड लावण्यात आले. समर्थ कॉलोनी, कारंजा येथील झाडांना ट्री गार्ड लावून झाडांना संरक्षण देण्यात आले. या प्रकारे जागतिक पर्यावरण संरक्षण दिवसाचे महत्व समाजा समोर मांडत असतांना सर्वांनी कमीत कमी एक झाड लावून त्याची पुढील 3 वर्ष निगा राखवी असे सुप्रभात परिवाराने समाजाला आव्हान केले.


