वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक:- 31 जुलै 2024
मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून मोठ्या प्रमाणात महिलांचा योजनेला प्रतिसाद मिळत आहे. परंतु ग्रामीण भागातील महिलाना ऑनलाइन नोंदणीत मोठ्या प्रमाणात समस्या येत आहे या करीत विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाणे यांनी देवळी मंतदारसंघाकरीत “मोबाईल व्हॅन” चे लोकार्पण केले
राजेश बकाणे यांनी सांगितले की देवळी मतदार संघात येणाऱ्या देवळी वर्धा व हिंगणघाट तालुक्यातील प्रतेक गावापर्यंत मो व्हॅन पोहचणार आहे . देवळी मतदार संघाच्या प्रतेक गावातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ पोहचविण्याचा प्रयत्न या व्हॅन च्या माध्यमातून होणार आहे . रक्षाबंधनाच्यापावन पर्वावर बहिणीच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ पाठविण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे .
आज या व्हॅन ला हिरवी झेंडी दाखविण्यात आली . व हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे रवाना करण्यात आले . या प्रसंगी राजेश बकाणे यांच्या सोबत राहुल चोपडा जिल्हा सरचिटणीस वर्धा जिल्हा जगदीश टावरी व्यापारी आघाडी उपद्याक्ष अरविंद नागतोडे ओबीसी जिल्हा सरचिटणीस किशोर गव्हाळकर माधुरीताई इंगळे जयश्री मोकादम चंदाताई ढगे शुभांगी कासार विभा राऊत संतोष भोयर प्रमोद ढोक विनोद नागतोडे निलेश कसणारे किरण तेलरांध्ये राजु इंगोले नरेंद्रजी मदणकर रवी करोटकर व मोठ्या संखेने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

