जयश्री पुंडकर यांचं दुःखद निधन

0
387

महाराष्ट्राच्या पूर्वेस असणाऱ्या गोंदिया जिल्हयाच्या आमगांव नगराच्या प्रतिष्ठित, कर्तव्यदक्ष जयश्री पुंडकरने सामाजिक व सरकारी क्षेत्रात आमगांवच्या मुकूटात मानाचा तुरा रोवला. सासरे स्वातंत्र्य सेनानी मुकुंदरावजी पुंडकरांचा सुन जयश्रीने वारसा घेतला. पोलीस विभागातील महिला अत्याचार विरोधी समितीच्या प्रमुख पदाला त्यांनी न्याय दिला. निःशुल्क सेवा दिली. सार्वजनिक क्षेत्रात सहकाराची भूमिका निभावणारे प्रख्यात फोटोग्राफर संतोष पुंडकरच्या अर्धांगिणी जयश्री पुंडकर शांत, शितल, निर्भिड, स्पष्ट वक्त्या, परखड मन व्यक्त करणाऱ्या जेसीआय आमगाव शाखेच्या चेअरपर्सन,महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्षा, राष्ट्रवादी तालुका संघटनेच्या महिला आघाडी शहर प्रतिनिधी होत्या. अध्यक्षा, महिला दक्षता समिती, पो.स्टे. आमगांव, सदस्य तालुका विधी सेवा समिती, सिव्हील कोर्ट, आमगांव, सदस्य मिशन वात्सल्य महाराष्ट्र शासन कोरोना एकल महिला पुर्नवसण, ता. आमगांव.     महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार 2014, अवयव दान जागृती अवार्ड, मुंबई 2018, विरागणा फातिमा शेख व सावित्रीबाई फुले सन्मान, नवी दिल्ली 2021, उद्योजक अवार्ड ग्यानमुद्रा एज्युकेशन अँकडमी, मुंबई गौरव अवार्ड, लोकमत सखी मंच, आमगांव वुमनस् अँचिवरर्स अवार्ड (सोशल वर्क), ऑनधिस टाईम मिडिया 2022 ने सन्मानित करण्यात आले. त्या विविध संघटनांशी जुडल्या होत्या. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील न्यायोचित कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित केले. त्यांची दोन्ही मुलं हर्षज पुंडकर व जेरी (वेद) पुंडकर सिनेसृष्टीशी संलग्न आहेत. थोरल्याने ड्रीमगर्ल हेमामालिनीच्या नृत्यांत सोबत दिली तर धाकटयाने डाकुमेंटरी फिल्म इंडस्ट्रित आपले स्थान निर्माण केले. जयश्री निश्चितच स्वाभीमानी होत्या. पण अभिमानी नव्हत्या. दिड महिण्यापुर्वी अचानक त्या चक्कर येऊन पडल्या. उपचार सुरु असतांना वयाच्या 53 व्या वर्षी दि. ३१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मावळवली.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ निर्माण झाली. हुतात्म्यास शांती प्रदान होवो. त्रिरत्नांच्या पुण्यप्रतापाने परिवार, सहकारी, आप्तेष्टांना हे दुःखाचे डोंगर सहन करण्याची शक्ती प्रदान होवो. हीच प्रार्थना.

प्राचार्य भाऊ वासनिक,आमगांव

 

Previous articleश्रीमती जयश्रीताई पुंडकर यांचे दुःखद निधन
Next articleसालेकसा पोलीस यांची उत्तम कमगिरी, 3 प्रकरणात खुलासा