माइकल मेश्राम
जिला प्रतिनिधि
सालेकसा ; – सालेकसा पोलिसाच्या मिडालेल्या प्रेस व्याप्ति नुसार सविस्तर असे की, प्रथम प्रकरण फिर्यादी नामे राहुल सोनेश्वर दमाहे वय ३० वर्ष रा. कुलपा ता. लांजी जि. बालाघाट (म.प्र.) हा त्याचा मामा नारायण भाऊलाल नागपुरे रा.लटोरी ता.सालेकसा जि. गोंदिया आपल्या मो.सा. क्र. MH 40 AG- 066 दि. 21/07/2024 चे 21 वाजता तथा दिनांक 22/07/2024 चे 5.30 वाजता च्या दरम्यान आंगणात ठेवले होंडा साईन कंपनीची काड्या रंगाची मो. सा. क्र. MH 40 AG- 066 किंमत 30,000/- रु. कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीचे तोंडी तकरारी वरुण पो.स्टे. सालेकसा येथे अप क्र. 226/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा नोंदवला गेला असुन गुन्ह्याचा तपास पो. हवा. कुवरलाल मानकर/1237 हे करित आहेत. सदर गुन्ह्याचे तपासात मिडालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहीती च्या आधारावर पोलीसा ने नामे सुशील राधेश्याम माहुले 23 वर्ष रा. दिघोरी ता. लांजी जि. बालाघाट (म.प्र.) तथा बालक नामे प्रांशु रमेश तिवारी वय 17 वर्ष 11 महिने रा. कुम्हारी (खुर्द) पो.अमेडा ता. लांजी जि. बालाघाट (म.प्र.) येथुन सदर मोटर साइकिल जप्त करण्यात आली.
प्रकरण दूसरे फिर्यादी नामे रतनलाल फत्तुलाल दमाहे वय 49 वर्ष रा.नवेगांव ता. सालेकसा जि. गोंदिया हे दिनांक 22/07/2024 चे 19.30 वा. ते 20.00 वाजता च्या दरम्यान स्वातच्या मोटर साइकिल ने आमगांव येथुन आपले गावी जात असतांनी साखरीटोला (झालीया) येथील नदीकाठावर असलेले शिवमंदीरच्या समोर दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या मोटर साइकिल ला थांबवून अज्ञात चोरांनी फिर्यादी च्या खिशातील टेक्नो कंपनीचा (AMON-15) मोबाईल किंमती 5,000/- रु. व मोबाईलच्या कव्हर मध्ये असलेले नगदी 150/- रु. असा एकुण 5,150/- रु. चा माल बळजबरीने हिस्कावून पळून गेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. ला अप क्र. 227/2024 कलम 304 (2) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्हयाचा तपास सहायक पो.नि. अरविंद राऊत पो.स्टे. सालेकसा हे करित आहेत. सदर गुन्हयाच्या तपासात मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे स्थागुशा गोंदिया पथक व पो.स्टे. च्या पोलीस पथकाने आरोपी नामे 1) धनराज रामचंद मच्छिरके वय 31 वर्ष रा. वार्ड क्र. 5 आमगांव तथा 2) सागर केवलचंद भोंडे वय 30 वर्ष रा. वार्ड क्र. 6 विठ्ठल नगर आमगांव यांना ताब्यात घेवून त्यांचे ताव्यातून गुन्हयात बळजबरीने हिस्कावुन घेतलेला मोबाईल व नगदी असा एकुण 5,150/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रकरण तीसरे फिर्यादी नामे सौ. आशा संजय मिसार वय 37 वर्ष ह.मु. प्रगती कॉलोनी, सालेकसा ही दिनांक 29/04/2024 रोजी सालेकसा बस स्टाप येथे सालेकसा ते गोंदिया जाणा-या बस मध्ये चढत असतांनी कोणतरी अज्ञात चोराने त्यांच्या जवळील मोठ्या पर्स मधुन सोन्याचे दागीने चोरुन नेल्याचे तक्रारीवरुन पो.स्टे. ला अप क्र. 199/2024 कलम 379 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना. राजेश तुरकर हे करित आहेत. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे सिमरण आशिक बिसेन वय 24 वर्ष जात. मांग गारुडी रा. शिवाजी बार्ड कुडवा, गोंदिया याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलले सोन्याचे दागीने जप्त करून सदरचे दागीनं फिर्यादीचे असल्याने फिर्यादी नामे सौ.आशा संजय मिसार वय 37 वर्ष ह.मु. प्रगती कॉलोनी, सालेकसा हीला परत करण्यात आले आहे.
वरील वस्तू. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, मा.नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिकारी गोंदिया कॅम्प देवरी, मा.प्रमोद मडामे उप-विभागीय पोलीस अधिकारी आमगाव, यांच्या माहिती व मार्गदर्शनात पो.नि. भूषण बुराडे (थानेदार), सहायक पो.नि. अरविंद राऊत, स्थागुशा गोंदिया समुदाय, पो.हवा. कुवरलाल मानकर/1237, पो.ना. राजेश तुरकर 1651, पो.ना. दिलीप निमजे 1856, पो.शि. वेदक 1851. पो.शि. परिहार 1861. पोशि रोकडे 1901. पो.शि. इंगले 2102. पो.शि. चुलपार 47, पोशि पगरवार/2150 पोशि गौतम 1968, मपोशि चौहान 1072 पो. सालेकसा यांनी सदर ची अंमलबजावणी पार पाडली.

