जंगलात सोडून अजगर सापाला दिले जीवनदान

0
126

सालेकसा/बाजीराव तरोने

सालेकसा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या हलबिटोला या गावी रात्री 9 वाजे च्या दरम्यान शंकर राऊत यांच्या घरी सात फूट लांब व दहा किलो वजनाचा अजगर साप निघाला असुन त्या सापाला सर्पमित्र रोहित शेंडे यांनी पकडुन गावालगत असलेल्या सुरजाटोला जंगल परीसरात सोडून जीवनदान देण्यात आले.