आमगांव : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दि.३१जुलै२०२४ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती आमगाव अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. नुकतेच मुख्याध्यापक एन .बी. बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळाचे गठन करण्यात आले होते.
उपरोक्त कार्यक्रमात शाळेचे सह शिक्षक शिवकुमार वाकले, महेश वैद्य,वामन किरमोरे,कु. स्वाती जाधव मॅडम,गणेश शिवणकर, आणि विकेश डोंगरे यांनी सहकार्य केले.

