आमगांव येथे प्रहार जनशक्ति पक्ष जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

0
239

आमगांव / सरोज कावळे

आमगांव : दिव्यांग, निराधार, शेतकरी, कामगार,अनाथ व जनसामान्यांचे कैवारी संस्थापक प्रहार व दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष मा. आमदार बच्चू कडू यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहचविन्यासाठी व पुढील काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लक्षात घेता दि.१ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी आमगांव येथे प्रहार जनशक्ति पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार ज.प. गोंदिया जिल्हा प्रमुख मा.महेंद्रभाऊ भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी,प्रमुख पाहुणे प्रदीप निशाने,शुभम टेम्भरे, सोनु वंजारी, प्रल्हाद असाटी, श्रीमती रुक्मीनीताई ठाकरे (सरपंचा भजियापार), देवेन्द्र रहांगडाले (उपसरपंच भजियापार), डुगेश्वर गौतम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमान्तर्गत उत्कृष्ट शिक्षक,१२वी प्रावीण्य विद्यार्थी, कराटे चैंपियन, वरिष्ठ पत्रकार, प्रगतिशील शेतकरी, उत्कृष्ट रुग्नसेवक,उत्कृष्ट आरोग्य सेवा अश्या विविध क्षेत्रात सेवा प्रदान करणारे सत्कारमूर्ति सर्वश्री उत्कृष्ट शिक्षक अनिल मेश्राम, धावपटु चैंपियन अंबिलाल वाळवे,वरिष्ठ पत्रकार राधाकिशन चुटे,धनराज भगत, गुणवंत विद्यार्थी,प्रगतिशील शेतकरी इत्यादींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जनसपंर्क कार्यालय उद्घाटन सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महेंद्रभाऊ भांडारकर यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्रहार जनशक्ति पक्ष संदर्भात पक्षाचे उद्दिष्ट, निकस,आणि दुर्लक्षित लाचार, ज्यांच्या कोणी वाली नाही अशा तळागळातील लोकांसाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे,असी ग्वाही दिली.
यावेळी सुनिल गिरडकर (प्र. आमगांव तालुका प्रमुख), खुमेन्द्र कावळे (दिव्यांग संघटना गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष),चंद्रकांत बडवाईक (आमगांव तालुका सचिव), सरोज कावळे (आमगांव ता.संपर्क प्रमुख), अर्जुन सोनसाठी, धुर्वराज बावनथडे, विनोद गणविर, सुधिर बावनथडे, टुलेश साठवने, निलेश वंजारी, कार्तीक जोशी, मुन्नाभाऊ भेलावे, नरेश बागडे, जितेंद्र भेलावे, विकास मेश्राम, कार्तीक आटक, धनंजय गाते, महेश बागडे, फलिंद्र बावनथडे, रितीक जुमळे,आशिष बन्सोड, रोहित तुमसरे, विजय राऊत, भुमेश्वर मेंढे, पुरुषोत्तम बहेकार, प्रल्हाद बहेकार, छगन बहेकार, रघुनाथ चुटे, नितेश रहांगडाले, सुनिल बागडे, मुनेश रहांगडाले, मनोज पेरणे, राजेश बावनकुळे, अतुल शेंदरे, राहुल शेंदरे, दिनेश बावनकुळे, शिवकुमार बिसेन, विलाश पुडे, गिरिश उईके, गौरिशंकर गिरडकर, आकाश राऊत, रोहित कामडी, गुलाब उईके, धर्मेंद्र पारधी, पृथ्वीराज पुसाम, सुभम भेदे, अनिल उदापुरे, नितेश जांभुळकर आदि बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र भेलावे आणि आभार प्रदर्शन सरोज कावळे यांनी केले.

Previous articleमिलिंद पंचभाई यांचे दुःखद निधन
Next articleसंकल्प नये युग का…