सालेकसा / बाजीराव तरोने
सालेकसा : तालुक्यातील ग्रामपंचायत रोंढा अंतर्गत येणाऱ्या फुटकाड बांधाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू होते. शेवटी कार्य पूर्ण झाले असून या पावसाळ्यात त्या झालेल्या बांधावर पाणी अडून राहत नसून सतत पाणी वाहत असते त्यामुळे बांधा खालील असलेला शेत शिवार पाण्याने भरलेला असतो.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या फुटकाड बांधाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप करीत शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने लघु पाटबंधारे विभाग सालेकसा यांना २ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन देऊन सदर कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देतानी शिवसेना जिल्हा युवासेना प्रमुख अर्जुनसिंग बैस, जिल्हा समन्वयक डॉ.हिरालाल साठवने, तालुका प्रमुख विजय नागपुरे, तालुका युवा प्रमुख मायकल मेश्राम, हेमराज लिल्हारे, शिवसेना शाखाप्रमुख घनश्याम नागपुरे यांची उपस्थिती होती.

