आमगांव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य आवारात उद्या दि.४ऑगस्ट रविवार रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार पक्ष) च्या वतीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी तर्फे नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार सोहळा व प्रा. नितेश कराळे यांचे विद्यार्थ्याना सामाजिक, शैक्षणिक विषयांवर व्याख्यान व मार्गदर्शन करणार आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे माजी गृहमंत्री मा.आ.अनिल देशमुख ,उदघाटक मा.अतुल गण्यारपवार (संचालक म.रा.पणन महामंडळ,मुंबई),तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे या मान्यवरांच्या उपस्थितीत मा.डॉ. नामदेवराव किरसान (खासदार गढ़चिरोली/चिमूर लो.स.क्षेत्र) व मा.डॉ. प्रशांत पड़ोळे(खासदार, गोंदिया/भंडारा लो.स. क्षेत्र) या सत्कारमूर्तीचे सत्कार करण्यात येणार असून प्रा. कराळे उपस्थित समस्त जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.
उपरोक्त कार्यक्रमात समग्र रयतेला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उद्या कराळे गुरुजी आमगांवात…
1