# शहरवासीयांच्या जिवाला धोका…
आमगांव : गोंदिया रोडवर असलेल्या शिवनाथ पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस असलेल्या रेणुका नगरला पावसाळ्यात मिनी तलावाचे स्वरूप आले आहे.पावसाच्या पाण्यामुळे निचरा होऊ शकत नाही. त्यामुळे पाणी तुंबल्याने वसाहत जलमय होते.
त्यामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वसाहतीतील रहिवाशांनी नगर परिषदेला अनेक निवेदने देऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले व रस्ते बांधण्याची मागणी केली. मात्र नगर परिषदेचे रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रहिवासी जनता चिंताग्रस्त आहे.

