
गोंदिया : समाज व राष्ट्रहित दृष्टीसमोर ठेवून समर्पण भावनेने धडाडीने कार्य करणाऱ्या आमगाव येथील प्रतिष्ठित समाजसेविका त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावी कार्यकर्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भाध्यक्ष श्रीमती जयश्री संतोष फुंडकर (भारत स्टुडिओ) या निष्पक्ष, निस्वार्थ, निर्भीड लोकप्रिय समाजसेविका व कुशल वक्त्या होत्या. जयश्रीताई फुंडकर यांचे मेंदूच्या आजाराने अत्यंत कमी वयात निधन झाले ही बातमी कानावर पडल्यामुळे लोकनेते माननीय खासदार प्रफुल भाई पटेल यांनी स्वर्गीय जयश्री पुंडकर यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी दि.२ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी परिवाराची भेट घेऊन स्व.जयश्री पुंडकर यांच्या तेलचित्राला श्रद्धांजली वाहून त्यांना चिरशांती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार मनोहर चंद्रकापुरे, तालुका अध्यक्ष सुरेश हर्षे, रवी शिरसागर, कमलबापू बहेकार, प्रभाकर दोनोडे, स्वप्निल कावडे, उपस्थित होते. याप्रसंगी पटेल साहेबांनी संतोष पुंडकर व कुटुंबीयांचे या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी सांत्वन केले.

