शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

0
413
1

आमगांव : दि.२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे शालेय विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालय आमगावच्या वतीनेशालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एक ते सात वर्गाचे विद्यार्थी त्यांचे वजन उंची,आजार तपासून त्यांना औषधी वाटप करण्यात आले असून आरोग्य विषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन बी बिसेन सह शिक्षक शिवकुमार वाकले,महेश वैद्य,वामन किरमारे,विकेश डोंगरे, गणेश शिवणकर,कु.स्वाती जाधव सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.