ओबीसी आणि एससी समाजातील लोकांनी जागे व्हावे… # छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घराघरात लावावे – प्रा. नितेश कराळे

0
116
1

आमगाव – केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाई गगनाला भिडले.पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, शैक्षणिक साहित्य आदींवर कर लादून मोदी सरकार गरिबांची लूट करत आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार संकुलात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित खासदारांच्या सत्कार कार्यक्रमात वरील प्रतिपादन प्रबळ वक्ते प्रा.नितेश कराडे यांनी केले.
सामाजिक, शैक्षणिक, विषयांवरील भाषणात प्रा.नितेश कराळे म्हणाले की, सर्व समाजातील लोकांनी महापुरुषांना आपापल्या समाजाचे नेते बनवून त्यांना वेठीस धरले आहे. ज्या घरामध्ये महापुरुषांचे फोटो दिसतात त्या घरासाठी त्या घराकडे जाणारी व्यक्ती म्हणते की, हे अश्या समाजाचे आणि जातीचे घर आहे. प्रा.कराळे म्हणाले की, ओबीसी, एससी समाजातील लोकांनी आपल्या घरासमोर कोणत्याही एका महापुरुषाचा फोटो लावला तर हे घर कोणत्या जातीचे आहे हे बाहेरून येणाऱ्या लोकांना समजणार नाही.
प्रा.नितेश कराडे यांनी शैक्षणिक व सामाजिक आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
सत्कारमूर्ति या कार्यक्रमाला काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमात उपस्थित एड दुष्यंत किरसान यांचे शाल व श्रीफळ देऊन आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आले.
मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष (शरद पवार) – अतुल गण्यापवार, गुड्डू बोपचे, एड, दुष्यंत किरसान, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ, वंदना ताई राजू काळे, काँग्रेस नेते राजकुमार पुराम, संपत सोनी, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते महिला , पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व सूत्रसंचालन घनश्याम रहांगडाले यांनी केले.