नुटा गोंदिया जिल्हा मेळावा संपन्न

0
336
1

गोंदिया : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या रविवार, दिनांक ७ जुलै २०२४ रोजीच्या बैठकीत संमत झालेल्या ठरावानुसार,जिल्हास्तरीय मेळाव्यांचे आयोजन करावयाचे असल्याने गोंदिया जिल्हा मेळावा दिनांक ०४ ऑगस्ट २०२४, रोज रविवार ला दुपारी ४.०० वाजता जगत महाविद्यालय गोरेगाव येथे संपन्न झाला.
      या सभेला मंचावर गोंदिया जिल्हा नूटा सचिव डॉ. जी. के. भगत, गोंदिया जिल्हा नूटा अध्यक्ष डॉ. प्रदीप भानसे, महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल ढगे, विद्यापीठ स्तरीय नुटा संघटनेचे सचिव डॉ. नितीन कोंगरे तसेच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे चे सदस्य डॉ. बागडे उपस्थित होते.
      याप्रसंगी डॉ. जी. के. भगत यांनी प्रास्तविक भाषण केले. महासंघाची भूमिका डॉ. नितीन कोंगरे यांनी विषद करून प्रशासन स्तरावर कशी संविधानिक नियमाची पायमल्ली होते, हे विविध उदाहरण देऊन समझावून सांगितले तर भविष्यात येणारे धोके कसे व कोणते या विषयी सविस्तर प्रबोधन डॉ. अनिल ढगे सरांनी केले व महासंघाने पारित केलेल्या ठरावानुसार प्रत्येक टप्प्यात प्राध्यापकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
     उपरोक्त कार्यक्रम दरम्यान नुटा सदस्य डॉ. देवाभाऊ बिसेन एम. बी.पटेल महाविद्यालय, देवरी यांचा मान्यवरांच्या हस्ते निवृत्ती सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमांचे संचालन डॉ. कल्पना घोषाल मॅम, डी. बी. सायन्स कॉलेज गोंदिया यांनी केले तर आभार डॉ. बी. जी. सूर्यवंशी जगत महाविद्यालय गोरेगाव यांनी मानले.
     मेळाव्याला जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया, तिरोडा,सडक अर्जुनी, देवरी व मोरगाव अर्जुनी या विविध तालुक्यातून 45 ते 50 प्राध्यापक उपस्थित होते. प्रश्र्नोत्तरांच्या तासात विविध प्राध्यापकांनी आपापले प्रश्न मांडून उत्तराच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.