यशोधरा विद्यालय चामोर्शी येथील साजेदा कुरेशी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
48
1

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले

चामोर्शी – स्थानिक  यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे कर्तव्यदक्ष शिक्षिका साजेदा कुरेशी मॅडम यांचा सेवानिवृत्तीपर पतीसह सत्कार आयोजित करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके, संस्थेचे कोषाध्यक्ष वक्टुजी उंदिरवाडे सत्कारमुर्ती साजेदा कुरेशी , रकिब शेख , आदर शेख तसेच शिक्षक राजू धोडरे, प्रविण नैताम, सरिता वैद्य , जयश्री कोठारे , अमोल उंदीरवाडे, गुरू सातपुते , प्रा. प्रशांत वालदे, प्रा.प्रविण गव्हारे, प्रा. प्रदीप भांडेकर , सुधाकर भोयर , लक्ष्मण गव्हारे, रुपलता शेंडे , आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी साजेदा कुरेशी यांनी शाळेच्याप्रती समर्पित भावनेने केलेल्या कार्याचा गौरव करुन त्यांना निवृतीपश्चात सुखी समृद्ध व आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या . विशेष म्हणजे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रिय शिक्षिकेसाठी विशेष गिफ्ट आणले होते . या अत्यंत भावनिक अशा कार्यक्रमाचे संचालन सरिता वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले .