आमगाव : स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ई-पॉस मशीनच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य वितरणाचे धोरण अमलात आणले; पण कधी इंटरनेटची समस्या, तर कधी
सर्व्हर डाऊन राहत असल्याने स्वस्त धान्य वितरणात अडचणीत आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून
सर्व्हर डाऊनची समस्या भेडसावत असल्याने या प्रकाराला वैतागलेल्या आमगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन जमा करो आंदोलन केले.
शासनातर्फे वर्ष २०१८ पासून राज्यातील ५२ हजार स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या माध्यमातून स्वस्त धान्य वितरित करण्याची प्रणाली अमलात आणली इ-पॉस पण गेल्या दोन महिन्यांपासून ई-पॉस.मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य वितरणात अडचण येत आहेत.परिणामी रेशनकार्डधारक, मोलमजुरी करणे मजूर अडचणीत आले आहेत. सर्व्हर डाऊनमुळे त्यांना वारंवार स्वस्त धान्य दुकानाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. तर स्वस्त धान्यदुकानदारांना बरेचदा रेशनकार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करण्यात आल्या; पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. परिणामी ही समस्या कायम आहे. त्यामुळे आमगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन परत करो आंदोलन केले.
यावेळी राशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवराव बिसेन, उपाध्यक्ष किशोर बिसेन, सचिव टेकचंद पवार, आयुब पठाण, सुरेश कोरे,अमरलाल लिल्हारे , संतोष रावत, युवराज मेश्राम, ललित महारवाडे, राधेश्याम मेंढे राजेश मिश्रा, यशवंत गौतम, कमलाबाई वैरागडे, तुलसीराम मेंढे, राधेश्याम डोये, दिनदयाल चौरागडे, हंसराज मेश्राम, ग्यानीराम बोरकर, वाय. ए. पोगळे तसेच तालुक्यातील राशन दुकानदार उपस्थित होते.
सर्व्हर डाऊनच्या समस्येने व रेशन दुकानदारांच्या विविध मागाण्यांना घेऊन आमगाव तालुका राशन दुकानदार संघटनेने ई-पॉस मशीन केल्या विभागाकडे परत…
1