आमगांव : गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलीस ठाणे अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत एस.आय.एस. (इंडिया) लि. व पोलीस विभाग यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत सुरक्षा गार्ड करीता उमेदवारांची नोंदणी करुन प्रशिक्षण देणे व ते पुर्ण केल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये सुरक्षा गार्ड म्हणुन रोजगार देण्याकरीता दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता ते ४ वाजे पर्यंत पोलीस स्टेशन आमगांव अंतर्गत येत असलेल्या भवभुती महाविद्यालय आमगांव येथील मेजर ध्यानचंद क्रिडा संकुल येथे खालील पदासांठी उमेदवार यांची शैक्षणीक व शारीरीक पात्रता …
सुरक्षा गार्ड :- शिक्षणः-१० वी पास, वयः- २१ ते ३५ वर्षे उंची:- १६८ से.मी.,छाती :- ७७-८२ से.मी., वजन :- ५६ कि.ग्रा., एकुण पद :-२००
सुरक्षा सुपरवाईजर : शिक्षण:- १२ वी पास वयः २१ ते ३५ वर्षे उंची:- १७० से.मी. छाती:-७७-८२ से.मी. वजन:- ५६ कि.ग्रा. एकुण पदः-५० जागांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
उमेदवारांकरीता आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे, टि.सी., आधार कार्ड, २ पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांचे शारीरीक मोजमाप व वैद्यकीय चाचणीं करण्यात येणार असुन त्यामध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कमाण्डेंट, क्षेत्रीय प्रशिक्षण अकॅडमी नागपुर (म.रा.) येथे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर एस.आय.एस. गृप सह संलग्नीत असलेल्या कंपन्यांमार्फत संपुर्ण भारत देशातील विविध शासकीय, अर्धशासकीय, खाजगी, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीचे औद्योगिक केंद्र, खाणी, शैक्षणिक केंद्र, होटल, हॉस्पीटल्स, मॉल, टॉल ब्रिज, मेट्रो तसेच एअरपोर्ट इत्यादी ठिकाणी सुरक्षा गार्ड/सुपरवायझर म्हणुन नेमणुक केली जाणार आहे.
सदर कंपनीमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी यांना ६५ वर्षापर्यंत नोकरी, इ.पी.एफ., ई.एस.आई., ग्रेच्युटी, बोनस, फॅमीली पेंशन, अपघात विमा व इतर सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.
करिता पोलीस स्टेशन आमगांव हद्दीतील बेरोजगार युवक़ांना पोलीस स्टेशन आमगांव अंतर्गत येत असलेल्या भवभुती महाविद्यालय आमगांव येथील मेजर ध्यानचंद क्रिडा संकुल येथे सदर रोजगार मेळाव्याबाबत अवगत करुन आप आपल्या गावातील बेरोजगार युवकांना संधीचा लाभ घेण्याबाबत कळवावे असे पो.स्टे. आमगांव तर्फे आवाहन केले आहे.