विकासाच्या नावावर ठेंगा…
जनप्रतिनिधि यांचे दुर्लक्ष, सर्व जनप्रतिनिधि कांग्रेस चे…
जिला प्रतिनिधि माइकल मेश्राम
9881664865
सालेकासा : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका हा आदिवासी नक्सल प्रभावित अतिदुर्गम अविकाशित तालुका या नवाने ओळखला जात असुन आमगांव देवरी विधानसभा अंतर्गत येतो आणि येथिल नेतृत्व करण्यासाठी विद्यमान अनुसूचित जमाती तून येत असुन आदिवासी बहुल क्षेत्र असलेला ST प्रवर्गासाठी जागा आरक्षित आहे.आदिवाशियांच्या विकासा च्या नावावर आमदार झाले सहसरम कोरोटे 5 वर्ष संपत आले असुन विधान सभा अंतर्गत रोड रस्त्यांचे हालतीत सुधार पाहायला मिळाले नाहीत.
याचेच एक उदाहरण पहायला मिळतोय सालेकसा तालुक्यातील गिरोला ग्रामपंचायत अंतर्गत इस्नाटोला जाणारा मार्गावर, हा रस्ता सिंधीटोला , जोशीटोला, तिरखेडी, गोरे ह्या मार्गाला जोडतो व ह्या मार्गाने तिरखेडीतील हायस्कूल व सालेकसा ला शिक्षणासाठी यावे लागते ह्या रस्त्यात खूप मोठे खड्डे असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावे लागत आहे अनेकदा लोकप्रतिनिधी ला रस्त्याबद्दल लेखी तक्रार करून सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष करीत आहेत म्हणून इस्नाटोला गावातील नवयुवकांनी कपडे काढून खड्ड्यात आंघोळ केल्याचे आंदोलन केले आहे.
आंदोलन करते वेळी प्रमोद शिवणकर, राहुल शिवणकर, नकुल बहेकार, कृष्णा चुटे, अंकित ठाकरे, सुनील तिरपुडे, मोहित ब्राह्मणकर, दुर्योधन ठाकरे व गावकरी सामील होते.