आमगाव : स्थानिक भवभुती शिक्षण संस्था द्वारा संचालित, श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव मध्ये आज दि. ८ ऑगस्टला विद्यार्थी परिषदेची निवड करण्यात आली.
विद्यार्थी परिषदेची नियुक्ती करण्याचा उद्देश महाविद्यालयीन उपक्रम आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प आयोजित करून व राबवून नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शालेय भावना आणि समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करणे हा विद्यार्थी संघटनेची जबाबदारी आहे.
विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर म्हणाले की, महाविद्यालयाचे विविध उपक्रम व योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे व समन्वयासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी जबाबदारीने काम करावे.
महाविद्यालयीन सुधारणा समिती चे अध्यक्ष व संस्थेचे कार्यवाह श्री केशवराव मानकर तसेच टेक्. ॲडव्हायझर डॉ. डी. के. संघी सूचनेनुसार उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि निवड निकषंच्या आवश्यकतेनुसार निवड व्हावी व त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता क्रीडा वर्तन आणि संपूर्ण कॅम्पस मधील मापदंडाच्या समावेश करण्यात यावा व त्यानुसार विद्यार्थी समितीचे गठन करण्यात आले.
त्यानुसार श्रीदय भांडेकर, तनिष्क जांगडे, आरती हत्तीमारे, मनस्वी कावळे, कुणीका हत्तीमारे, धारा गौतम, मृणाली रीनायते, गौरव शिवणकर, जिया कावळे, साक्षी बिसेन, आर्यन गुप्ता, यामिनी सोनवणे व रितिक जैतवार या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अधिसभेमध्ये संधी मिळाली.
सदर निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. देवेंद्र बोरकर, प्रा. जितेंद्र शिवणकर, प्रा. चेतन बोरकर, अनिल सोरी, रोशनी अग्रवाल, मनीषा बिसेन, राणी भगत उपस्थित होते.

