सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन व ब्युटी पार्लर व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण

0
351

      गोंदिया, दि.7 : बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील मुलांकरीता सी.सी. टीव्ही इन्स्टॉलेशन व्यवसायाचे तेरा दिवसीय मोफत प्रशिक्षण संभाव्य 16 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे व मुलींकरीता ब्युटी पार्लर व्यवस्थापन व्यवसायाचे तीस दिवसीय मोफत प्रशिक्षण 1 सप्टेबर 2024 पासून सुरु होणार आहे. आरसेटीला कोर्स सुरु करण्याकरीता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची गरज असते. या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची व जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी जास्तीत जास्त संख्येने लवकरात लवकर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत.

         सुशिक्षीत बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदनपत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहणे पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 07182-252007 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9403359907 यावर संपर्क करावे, असे संस्थेचे निदेशक राहुल गणवीर यांनी कळविले आहे.

Previous articleविद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय आमगांव मे शालेय मंत्रिमंडल गठन
Next articleगोंदियाचे नवीन पोलीस अधिक्षक भामरे