तालुका कांग्रेस कमेटी तर्फे अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी

0
292
1

जिला प्रतिनिधि माइकल मेश्राम
9881664865

सालेकसा :- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर मधील भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी सालेकसा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेकडो हेक्टर मधील विविध पिके बाधित झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे त्वरीत करण्यात यावे .असी मागणी तालुका काँग्रेस ने केली आहे.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची घोषना शासनाने केली आहे,पण अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.त्यामुळे शेतकरी शासनाच्या प्रती रोष व्यक्त करीत आहेत.जिल्हाप्रशासनाने नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी,असे निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात तालुका काँग्रेस अध्यक्ष राजु दोनोडे,सभापती प्रमीला गणविर,उपसभापती संतोष बोहरे,पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे माजी पंचायत समिती सदस्य कैलाश अग्रवाल, भारत लिल्हारे,घनश्याम नागपुरे शैलेश बहेकार, योगेश बहेकार,विनय शर्मा,आशुतोष असाटी,अमोल शहारे,जागेश्वर नागपुरे,दिलीप बिसेन,योगेश दशरिया,नरेश कावरे,सुनील हत्तीमारे व अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता.