मधमाशांच्या हल्ल्यात मजूर जखमी;आमदार कोरोटे यांनी घेतली जखमी मजुरांची भेट

0
205

आमगांव : सालेकसा तालुका अंतर्गत भजेपार येथील मजुरांचा समूह भजेपार –  बोरकन्हार रोड़वर मंगरू बाबा आश्रम जवळ सकाळी 10 ते 11 वाजे दरम्यान झाडांचे संवर्धन कार्य सूरू असताना एका डुंबरातून (वारूळ) मधमाशांचा एक झुंड मजुरांवर हल्ला केले. त्यात 11 मजूर जखमी झाले. त्यांना आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता तेथील डॉक्टर उपचार करण्याकरिता टाळाटाळ करीत होते याची माहिती एका मजुराच्या नातेवाईकाने आमदार मा. सहसराम कोरोटे यांना दूरध्वनी द्वारे माहिती दिली. बातमी ऐकून त्याची दखल घेऊन आमदार यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस करून डॉक्टरांना उपचार करण्याकरिता निर्देश दिले.

समुहातील 5 गंभीर रुग्णाना के. टी. एस. गोंदिया येथे उपचारासाठी हलविण्यास सांगितले. त्यावेळी सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी वाय. बी. सोनटक्के, वनरक्षक  एल. जे. लांजेवार, कु. एस. बी. बागडे, आणि आमगाव तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. संजयभाऊ बहेकार उपस्थित होते.