गोंदिया : आज गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने चांदनी चौक येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त जननायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून सर्व समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या माजी आमदार राजेंद्र जैन व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवाची गोंदिया शहराच्या विविध मार्गाने निघालेल्या रॅली ला चांदनी चौक येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने महाप्रसाद वितरण करण्यात आले.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, शिव शर्मा, पुजा अखिलेश सेठ, अशोक सहारे, नानू मुदलियार, केतन तुरकर, माधुरी नासरे, करण टेकाम, हेमंत पंधरे, सुचिता चव्हाण, लवली व्होरा, विनीत शहारे, शैलेश वासनिक, अनुज जयस्वाल, लव माटे, प्रशांत सोनपुरे, नागो बंसोड, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, रौनक ठाकुर, शरद मिश्रा, प्रतीक पारधी, मोनू मेश्राम, नरेंद्र बेलगे सहीत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

