विनेश फोगाटने पराभवाला खचुन न जाता पुन्हा जोमाने उभे राहुन देशासाठी पुन्हा खेळावे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा मा.खासदार रामदास तडस…….

0
437

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-11 ऑगस्ट 2024

वर्धा: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने क्युबाच्या युसनेलिस गुजमान हिच्यावर 5-0 असा नेत्रदीपक विजय मिळवून 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली. कुस्ती या खेळातील कोणत्याही वजनी गटाची अंतिम फेरी गाठणारी विनेश ही भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली. परंतु अंतीम फेरीत 50 किलो वजनी गटात महिलांच्या स्पर्धेत अवघे काही ग्रॅम वजन अतिरिक्त असल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलेे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत महत्वाची लढाई तांत्रिक कारणामुळे विनेश फोगटला खेळता आले नाही याचे एक कुस्तीगीर म्हणून दुःख आहे. विनेश फोगाट हिचे पदक जरी हुकले असले सर्व भारतीयासाठी ती विजेता आहे, आम्हा सर्व कुस्तीपटुंना अभिमान आहे व सर्व कुस्तीगीरासाठी प्रेरणा आहे, विनेश फोगाटने कुस्तीमधुन निवृत्तीची बातमी आली आहे, ती सर्वासाठी धक्कादायक आहे, एक कुस्तीगीर म्हणून मला असे वाटते की, निवृत्तीची ही वेळ नाही, असुन देशासाठी पुन्हा विनेश फोगाटने खेळावे व निवृत्तीचा निर्णय माग घ्यावा असे यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा मा.खासदार रामदास तडस म्हणाले.  जागतिक कुस्ती संघटनेकडून कुस्तीखेळासाठी नियम तयार करण्यात आले आहे. त्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सुध्दा पालन करते, खंडांर्तगत स्पर्धा व जागतिक, ऑलिंपिक यामध्ये थोडासा फरक आहे. खंडांर्तगत स्पर्धा म्हणजे आशियाईसारख्या स्पर्धामध्ये एका दिवसांतच लढती आटोपतात. त्यामुळे खेळाडूंचे वजन एकाच वेळी केल्या जाते, परंतु जागतिक किंवा ऑलिंपिक क्रीडा महोत्सवात पहिल्या फेरीपासून उपांत्य फेरीच्या लढती एका दिवसात होतात, स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीआधी आणि अंतिम फेरीच्या दिवशी पुन्हा कुस्तीपटूंचे वजन केले जाते. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये नियमानुसार प्रक्रिया पार पडली असेल. विनेश फोगाट वाढलेल्या वजनामुळेच अपात्र ठरवली गेली असेल. भारताने हमखास मिळणारे पदक गमावले, याचे दुःख होत आहे. विनेश चांगल्या फॉर्ममध्ये होती. त्यामुळे अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावण्यासाठी तिचेच पारडे जड होते, जागतिक कुस्ती संघटना व आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांच्या नियमाविरोधात जाता येत नाही. कारण त्यांनी तो नियम बनवला आहे. त्यामुळे नियमा विरोधात अपील करता येत नाही, त्यामुळे विनेश फोगाटने पराभवाला खचुन न जाता पुन्हा जोमाने उभे राहुन देशासाठी पुन्हा खेळावे व भारताचे नाव जागतीक स्तरावर मोठे करावे असेही यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा मा.खासदार रामदास तडस म्हणाले.

Previous articleमतदार यादी निरीक्षक विभागीय आयुक्त उद्या गोंदिया जिल्हा दौऱ्यावर
Next articleन्यू क्रिएशन : शेतकऱ्याचा मुलगा बनवतोय वर्ध्यात चित्रपट…